लातूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातीलजनमाता आई मंदिरात रोटरी च्या वतीने वाटर फिल्टर तर चेअरमन डॉ. गोविंदराव माकणे यांच्या वतीने आठ फॅन अर्पण करण्यात आले. हाळी खुर्द येथील मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.
हाळी खुर्द (खुर्दळी, ता.चाकूर) येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री. जनमाता आई मंदिरात रोटरी क्लब ऑफ चाकूर च्या वतीने भाविक भक्तांच्या सोयीसाठी वॉटर फिल्टर तर चाकूरच्या विशाल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉ. गोविंदराव माकणे यांच्यावतीने मंदिराच्या सभागृहात आठ फॅन अर्पण करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. ब्रह्माजी केंद्रे, चेअरमन डॉ. गोविंदराव माकणे, संचालक अजयकुमार नाकाडे, नागनाथ येरनाळे, रोटरी क्लब ऑफ चाकूर चे अध्यक्ष डॉ. केदार पाटील, सचिव ॲड. धनंजय चिताडे, प्रोजेक्ट चेअरमन शैलेश पाटील, आदींची यावेळी उपस्थिती होती. झालेल्या विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis