लातूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालयात लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालयामध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 10 ऑक्टोबर, 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे स्वत: उपस्थित राहावे.
निवड करण्यात आलेल्या उमेवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे, (नि.) यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक (जेसीओज तथा ओआर), माजी सैनिक विधवा व माजी सैनिक युद्ध विधवा यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis