गडचिरोली, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) गडचिरोली जिल्ह्यात लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 06 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात अर्ज दाखल करावयाचा आहे, त्यांनी पूर्वी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात आपली तक्रार मांडलेली असणे आवश्यक आहे. तालुका लोकशाही दिनात तक्रारीवर झालेल्या सुनावणीनंतर तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या उत्तरावर समाधान न झाल्यासच तक्रार जिल्हास्तरावर मांडता येणार आहे. त्याकरिता संबंधित तक्रारदारांनी तहसीलदारांचे उत्तर, तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच विहित नमुन्यातील (प्रपत्र 1 (ब)) अर्ज व त्याची आगाऊ प्रत जोडणे बंधनकारक राहील.
तसेच संबंधित तक्रारदारांचे तक्रार/निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचेच असावे, अन्यथा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. लोकशाही दिनाकरिता अर्ज कमीतकमी 15 दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond