अहमदाबाद, 1 ऑक्टोबर (हिं.स.) भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने सांगितले की, संघ घरच्या सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्यापेक्षा फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळू इच्छितो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, गिल म्हणाला की, संघ पहिल्या सामन्यात तिसरा वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. ही खेळपट्टी गवताने व्यापलेली आहे. गिल म्हणाला, मी कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी ज्या गोष्टींवर चर्चा झाली होती त्याबद्दल मी बोलू शकत नाही. पण आम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळायचे आहे, ज्या गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही अनुकूल असतील.तो म्हणाला, भारतात येणाऱ्या कोणत्याही संघासाठी आव्हान म्हणजे स्पिन आणि रिव्हर्स स्विंग. ही आव्हाने लक्षात घेऊन, आम्हाला गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही समर्थन देणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळायचे आहे. रविवारी संपलेल्या आशिया कपमध्ये टी-२० क्रिकेट खेळल्यानंतर गिल आणि इतर काही खेळाडूंना टी-२० फॉरमॅटशी जुळवून घेण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही, असे गिलने कबूल केले.तो म्हणाला, कसोटी सामन्याची तयारी करण्यासाठी आम्हाला फक्त दोन दिवस मिळाले आहेत. आम्हाला लवकरच दुसरा फॉरमॅट खेळायचा आहे. पण आम्ही नेटमध्ये खूप मेहनत घेतली आहे. गिल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुबईहून संघात सहभाग झाले. हवामान आणि परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही तिसरा वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. पण आम्ही उद्या निर्णय घेऊ. बुमराहला त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करून मैदानात उतरवले जाईल का असे विचारले असता, गिल म्हणाला, सामना किती काळ चालतो आणि गोलंदाजाला किती षटके टाकायची आहेत यावर अवलंबून आम्ही प्रत्येक सामन्याचा निर्णय घेऊ. ---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे