आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेचा पहिला टप्पा ४ ऑक्टोबरपासून
नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र -२०२५ च्या पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस पदवी व पदव्युत्त
MUHS


नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र -२०२५ च्या पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस पदवी व पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या खालील परीक्षा संपन्न होणार आहेत.

या परीक्षेत पदवी व पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या (1st year BDS & MDS) परीक्षा घेण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण अंदाजे ४,१२० विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहे. हिवाळी - २०२४ टप्पा-४ व उन्हाळी - २०२५ टप्पा १ ते ४ मधील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात आलेल्या आहेत तसेच ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केलेले आहे. याचप्रमाणे हिवाळी-२०२५ टप्पा-१ परीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी माहिती दिली.

सदरील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रसाठी सकाळी ९ वाजता परीक्षाकेंद्रावर रिपोर्ट करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande