म. प्रदेश: जबलपूरमध्ये भरधाव बस दुर्गा मंडपात घुसली ;पोलिसांसह २० जण जखमी
भोपाळ , 1 ऑक्टोबर (हिं.स.)।मध्य प्रदेशातील जबलपूर येथे मंगळवारी (३० सप्टेंबर) उशिरा रात्री एक मोठा अपघात घडला. जबलपूर येथील एका दुर्गा मंडपात अचानक बस घुसल्याने मोठाअपघात घडला. या अपघातात सुमारे २० लोक जखमी झाले असून ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर आ
म. प्रदेश: जबलपूरमध्ये दुर्गा मंडपात बस घुसल्याने अपघात


भोपाळ , 1 ऑक्टोबर (हिं.स.)।मध्य प्रदेशातील जबलपूर येथे मंगळवारी (३० सप्टेंबर) उशिरा रात्री एक मोठा अपघात घडला. जबलपूर येथील एका दुर्गा मंडपात अचानक बस घुसल्याने मोठाअपघात घडला. या अपघातात सुमारे २० लोक जखमी झाले असून ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर आरोपी बसचालकही यामध्ये गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी( ३० सप्टेंबर) रात्री सुमारे १० वाजता मंडपात पूजा सुरू होती. त्याच वेळी एक अनियंत्रित बस आत घुसली आणि लोकांनी भरलेल्या मंडपात धडक दिली.

यावेळी बसचा वेग खूपच जास्त होता. मंडपात घुसण्यापूर्वी बसने बाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांनाही धडक दिली होती असेही सांगण्यात येत आहे.

जबलपूरचे जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता. प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे. नो एंट्री सुरू असतानाही चालकाने बस शहरात आणली होती, आणि त्यामुळेच सिहोरा जवळील गौरी तिहाऱ्याजवळ दुर्गा मंडपात बस घुसली. या अपघातात एकूण २० लोक जखमी झाले आहेत. या घटनेत नो एंट्रीवर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली आहे. सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. बस रिकामी होती. सध्या मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना सिहोराहून जबलपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिहोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अपघातानंतर मंडपात उपस्थित असलेले लोक खूपच संतप्त झाले होते आणि त्यांनी बस जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बरीच मेहनत घेऊन जमावाला शांत केले, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकली असती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande