परभणी : आर.पी. हॉस्पिटलमध्ये पार पडली महाराष्ट्रातील पहिली एस आय जी परिषद
परभणी, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्रातील पहिली सेक्सोलॉजी एसआयजी परिषद पार पडली. वैद्यकीय क्षेत्रातील एस आय जी ही पहिली परिषद घेण्याचा मान आर.पी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला मिळाला. दोन दिवस झ
आर.पी. हॉस्पिटलमध्ये पार पडली महाराष्ट्रातील पहिली एस आय जी परिषद


परभणी, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्रातील पहिली सेक्सोलॉजी एसआयजी परिषद पार पडली.

वैद्यकीय क्षेत्रातील एस आय जी ही पहिली परिषद घेण्याचा मान आर.पी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला मिळाला. दोन दिवस झालेल्या या परिषदेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ.नवीन मोदी (मुंबई) डॉ. तरुण त्यागी (दिल्ली) डॉ.स्मिता चाकोते (सोलापूर)डॉ.सुर्वे (सातारा) डॉ.दिनेश भुतडा (परभणी) डॉ. फारुकी नाअमान (नांदेड), आशिष देशमुख (छत्रपती संभाजीनगर) यांनी आपले शोधनिबंध सादर केले धुळे येथील डॉ. जगदीश गिंदोडीया यांनी वाटर योगावर आपला शोध निबंध प्रस्तुत केला.डॉ. दिनेश भुतडा यांनी वैद्यकीय कायदा संबंधी माहिती दिली.परिषद दोन दिवसाची होती यात शंभरून अधिक त्वचा आणि गुप्तरोग तज्ञ सहभागी झाले होते एस आय जी परिषदेसाठी डॉ. मनीष कदम, डॉ. दिनेश भुतडा व आर पी हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande