नांदेड - माहूरगड श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत
नांदेड, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। माहूरगड येथील श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत करण्यात येणा
Q


नांदेड, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। माहूरगड येथील श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. या निर्णयासाठी संस्थेची बैठक घेण्यात आली यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. संस्थानतर्फे केलेल्या मदतीप्रमाणे इतरही नागरिक व संस्थानी आपआपल्यापरीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा प्रमुख न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी व्यक्त केला.

या बैठकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा संस्थेचे अध्यक्ष सुनिल वेदपाठक, माहूर उपविभागीय अधिकारी तथा उपाध्यक्ष श्री. मळगणे, किनवट उपविभागीय अधिकारी तथा संस्थेचे सचिव जेनितचंद्र दोन्तुला तसेच विश्वस्त मंडळ उपस्थित होते. संस्थानतर्फे समाजकारणाच्या कार्यात सातत्याने योगदान दिले जात असून यावेळी पूरग्रस्तांसाठी दिलेला एक कोटी रुपयांचा निधी हा समाजहिताचा आणि मदतीचा एक महत्वाचा उपक्रम ठरणार आहे. याप्रसंगी सर्व सदस्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande