परभणी, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।
धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सिंगणापूर फाटा येथे भव्य आंदोलन पार पडले. या आंदोलनाला गावचे सरपंच पांडुरंग खिल्लारे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.
आंदोलनावेळी एकत्रितपणे दिलेल्या निवेदनात शासनाने तातडीने धनगर समाजाला न्याय देऊन आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे, सिंगणापूर ग्रामपंचायत ही अधिकृतरीत्या धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारी एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
कार्यक्रमाला मंडळाधिकारी, ग्रामपंचायतचे सोसायटी चेअरमन शिवाजी जमरे, विठ्ठल पिसाळ, रामभाऊ खिल्लारे, भारत जमरे, सर रवि पिसाळ, प्रभाकर मुळे, सदाशिव जमरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सरपंच पांडुरंग खिल्लारे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करताना सरकारला तीव्र इशारा दिला. ते म्हणाले –
“आमचे आंदोलनकर्ते दीपक बोराडे हे सलग १४ दिवसांपासून अन्नपाणी त्याग करून उपोषणावर आहेत. त्यांच्या प्राणाला काही अनिष्ट घडले, तर आम्ही व संपूर्ण धनगर समाज शांत बसणार नाही. शासनाने याची गंभीर दखल घ्यावी.”
आंदोलकांनी रस्ता रोको करून आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवला. त्यानंतर निवेदन सादर करून आंदोलन संपन्न झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis