छ. संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मदतनिधीला
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मदतनिधीला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम पाठवली जाणार आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीनेबाधीत शेतकऱ्यांना मदत दे
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मदतनिधीला


छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मदतनिधीला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम पाठवली जाणार आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टीनेबाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देण्यास सहमती दर्शविली आहे. जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत कार्यरत १०८० अधिकारी व कर्मचारी मिळून संख्या आहे. या सगळ्यांचे मिळून एक दिवसाचे वेतन १५ लाख ११ हजार ८१३ रुपये इतकी रक्कम आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येईल,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande