नांदेड : शेतकऱ्यांची मदतीची रक्कम खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू
नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू/सरकार केंद
नांदेड : शेतकऱ्यांची मदतीची रक्कम खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू


नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू/सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २३० कोटी ४६ लाख रुपये वाटपासाठी माहिती भरण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांची माहिती पुढील ४-५ दिवसात ऑनलाईन प्रणालीवर नोंदवली जाईल. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना या प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande