'पीएनजी ज्वेलर्स'च्या नवीन दालनाचा दादरमध्ये विस्तार
मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : ''पीएनजी ज्वेलर्स''ने मुंबईच्या दादरमध्ये आपले नवीन दालन सुरू केले आहे. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. मुं
पीएनजी ज्वेलर्स नवीन दालन दादर


मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : 'पीएनजी ज्वेलर्स'ने मुंबईच्या दादरमध्ये आपले नवीन दालन सुरू केले आहे. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईमधील दादर येथे सुरू करण्यात आलेले हे दालन मुंबईतील मुख्य दालन असणार आहे. रानडे रोड, दादर पश्चिम या ठिकाणी विस्तारित असलेल्या स्टोअरमध्ये 'पीएनजी ज्वेलर्स'च्या सोने, हिरे, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे,

अभिनेता स्वप्नील जोशी यावेळी भावना व्यक्त करताना म्हणाला की, 'पीएनजी ज्वेलर्स' हे नाव प्रत्येक महाराष्ट्रीय घरात आदराने घेतले जाते. दादरमध्ये हे नवीन दालन उघडून, 'पीएनजी ज्वेलर्स' मुंबईत आपली मराठी माणसाची परंपरा जपत आहेत. रश्मी ताईंसोबत या प्रसंगी उपस्थित राहून मला खूप आनंद झाला.”

'पीएनजी ज्वेलर्स'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, “मुंबईने नेहमी पीएनजी ज्वेलर्सला विश्वासाने आणि आपुलकीने स्वीकारले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक तंतूंशी निगडित असलेल्या दादरमध्ये मुंबईतील मुख्य दालन उघडणे आमच्यासाठी खूप खास आणि अभिमानास्पद आहे. दादर स्टोअरला मुंबईतील आमच्या ग्राहकांसाठी एक प्रकाशस्तंभ बनवण्याची अपेक्षा करतो.”

दालनाच्या उद्घाटनानिमित्त नवरात्रीच्या निमित्ताने स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्के पर्यंत सवलत, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्के पर्यंत सवलत, तसेच सोन्याच्या एक्स्चेंजवर शून्य टक्के घट मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande