नांदेड - पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर
नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.): भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला असून यामध्ये पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्
अ


नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.): भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला असून यामध्ये पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू, इंद्रजीत गरड आदीची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले, भारत निवडणूक आयोगाचे 12 सप्टेंबर 2025 चे पत्रान्वये 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर 2025. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनप्रसिध्दी बुधवार 15 ऑक्टोंबर 2025. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनप्रसिध्दी शनिवार 25 ऑक्टोंबर 2025. नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे स्विकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 6 नोव्हेंबर 2025. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई गुरुवार 20 नोव्हेंबर 2025. मंगळवार 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी मंगळवार 25 नोव्हेंबर 2025 ते बुधवार 10 डिसेंबर 2025. गुरुवार 25 डिसेंबर 2025 रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे. मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे असा तपशिल आहे असे त्यांनी सांगितले.

मतदार नोंदणी नियम 1960 च्या नियम 31 (3) नुसार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांपैकी प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी पदवीधर मतदार संघाचे यादीत नाव नोंदणी करण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार नमुना 18 मध्ये संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पाठवावा किंवा पोहचवावा.

पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्यामुळे या मतदार संघातील सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीत ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत अशा सर्व व्यक्तींनी सुध्दा विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करावा.

पदवीधर मतदार संघासाठीची अर्हता :

जो व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी किमान 3 वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. 3 वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल आणि तो विद्यापिठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल.

अर्जदाराने अर्जासोबत स्वयंसाक्षांकित केलेल्या आणि अतिरीक्त पदनिर्देशित अधिकाऱ्याने यथोचितरित्या अधिप्रमाणित केलेल्या त्यांच्या पदवी गुणपत्रिका याची प्रत, सोबत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अर्जदाराने अर्जासोबत पासपोर्ट फोटो लावणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड निवडणूकीचे ओळखपत्र व प्रमाणित छायाचित्र ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी असल्यास नमुना सी मध्ये सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.आधारकार्ड जोडने मतदाराच्यावतीने ऐछीक आहे.

भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालयाच्या अधिसूचना 17 जून 2022 अन्वये पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठीच्या अर्जाचा अनुक्रमे नमुना क्र. 18 यामध्ये सुधारणा केलेल्या असून सदर सुधारणा 1 ऑगस्ट 2022 पासून लागू आहेत. तसेच सदर नमुना क्र.18 अर्जात आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे आणि मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद केलेला नाही या कारणास्तव अर्ज नाकारु नये, असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande