गाझा योजनेवर पाकिस्तानचा यू-टर्न
इस्लामाबाद , 1 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता, ज्याला पाकिस्तानने समर्थन दिले होते. ट्रम्प यांनी असेही सांगितले होते की, पाकिस्तान १०० टक्के गाझा योज
गाझा योजनेवर पाकिस्तानचा यू-टर्न


इस्लामाबाद , 1 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता, ज्याला पाकिस्तानने समर्थन दिले होते. ट्रम्प यांनी असेही सांगितले होते की, पाकिस्तान १०० टक्के गाझा योजनेला अमेरिकेला पाठिंबा देईल. शहबाज शरीफ यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल ट्रम्पच्या योजनेला योग्य ठरवलं, पण पाकिस्तानच्या जनतेने त्या निर्णयाचा विरोध केला आहे. जनतेचा विरोध पाहून आता शहबाज सरकार ट्रम्पच्या प्रस्तावावर यू-टर्न घेत असल्याचे दिसते.

पाकिस्तानी मीडियानुसार, विदेश मंत्री इशाक दार यांनी ट्रम्पच्या २०-बिंदूंच्या शांती प्रस्तावापासून पाकिस्तान वेगळं असल्याची भूमिका घेतली आणि त्याला “अमेरिकेचे दस्तऐवज” म्हटलं. त्यांचं मतं आहेत की काही गोष्टी त्या प्रस्तावात नाहीत ज्या पाकिस्तान समाविष्ट करू इच्छित आहे. “जर त्या समाविष्ट नाहीत, तर समाविष्ट केल्या जातील.” ट्रम्पच्या प्रस्तावाला भारत, चीन, रशिया सहित आठ अरब व मुस्लिम बहुल देशांनी कौतुक केलं आहे. त्या देशांमधून पाकिस्तान आता या मुद्यावरून आपलं मत बदलत आहे.

इशाक दार म्हणाले की ट्रम्पच्या योजनेत तंत्रज्ञांच्या नेतृत्वाखाली फिलिस्तीनी सरकार स्थापण्याचा विचार आहे, ज्यावर एक आंतरराष्ट्रीय संस्था देखरेख करेल, ज्यामध्ये फिलिस्तीनचे लोक बहुमताने सहभागी असतील. गाझामध्ये पाकिस्तानी सैनिक पाठवण्याच्या विषयावर त्यांनी सांगितलं की, त्याचा निर्णय “शीर्ष नेत्यांद्वारे” घेण्यात येईल.

ट्रम्प यांनी शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना या विषयावर चर्चेत सक्रिय जागतिक नेत्यांमध्ये समाविष्ट केलं होतं. ट्रम्प म्हणाले, “ज्यांचा मी उल्लेख करत आहे, त्यातील बहुतांश लोक आमच्यासोबत होते. इतरांनी फोनवर किंवा दुसर्‍या दिवशी भेट दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान व फील्ड मार्शल सुरुवातीपासून आमच्यासोबत आहेत, हे अविश्वसनीय आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande