सोनपेठमध्ये रोजगार मेळाव्यातून 75 बेरोजगारांना रोजगाराची संधी
परभणी, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा उपक्रमा अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोनपेठ येथील श्री. छत्
सोनपेठला आयोजित केलेल्या पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 75 सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराची संधी


परभणी, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा उपक्रमा अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोनपेठ येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 75 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. तर लवकरच 300 जणांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे.

या मेळाव्यास अध्यक्षस्थानी राजीव गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे, सेवा पंधरवडा संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस डॉ.पंडितराव दराडे, सेवा पंधरवड्याचे प्रभारी भाजप नेते सुभाष आंबट भाजपचे नेते प्रा. मुंजाभाऊ धोंडगे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.मतीन, आबासाहेब मोकाशे, माजी मंडळाध्यक्ष मलिकार्जुन सौंदळे, ग्रामीणचे मडळाध्यक्ष लक्ष्मणराव धोंडगे, शहराचे मंडळाध्यक्ष संतोष अंबुरे, महीला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमास राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी राज्य सरकार सुशिक्षित बेरोजगारांसाठी अनेक योजने अंतर्गत नौकरीसाठी व उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे, याचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी घेतला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ. दराडे, प्रा. धोंडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मव्हाळे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सोनपेठ मध्ये रोजगार मेळावा होत आहे या सुवर्ण संधीचा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे म्हटले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त बालाजी मरे यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी सर्वश्री ओंकार यादव, सुभाषराव सावंत, उत्तमराव पवार, शिवराम रोडे, मेहमूद कुरेशी, विष्णुपंत देशपांडे, परमेश्‍वर कुगणे, निखिल गोरवे प्रेमाकर कोटुळे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यातून साधारणपणे 75 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली व आणखी तीनशे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी स्काय प्लेसमेंट छत्रपती संभाजीनगर, कल्याण मेटल इंडिया प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर, स्वतंत्र मायक्रो फिन प्रा.लि. परभणी, क्रेडिट क्सेस ग्रामीण लि. परभणी, एलआयसी परभणी, शिवशक्ती ग्रीटेक लि. लातूर, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी परभणी, धूत ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर, ग्रोवर्स ऑटो इंडिया प्रा.लि. पुणे या कंपनीचे अधिकारी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande