पाण्याअभावी परतवाड्याची तगमग; जिओच्या कामामुळे पाईपलाईन खंडित
अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)जिओ कंपनीच्या मनमानी कारभारामुळे परतवाडा शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन उत्सवाच्या दिवसात घरात पाणी नसल्यामुळे प्रामुख्याने महिला वर्गापुढे गंभीर संकट निर्माण झाले आहे. जिओ कंपनीचे केबल टाकण्याचे काम करण्यासाठ
पाण्याअभावी परतवाड्याची तगमग; जिओच्या कामामुळे पाईपलाईन खंडित


अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)जिओ कंपनीच्या मनमानी कारभारामुळे परतवाडा शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन उत्सवाच्या दिवसात घरात पाणी नसल्यामुळे प्रामुख्याने महिला वर्गापुढे गंभीर संकट निर्माण झाले आहे. जिओ कंपनीचे केबल टाकण्याचे काम करण्यासाठी जुळ्या शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदले जात आहे. त्याच जागेवरून नगरपालिकेची पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. केबलसाठी खड्डे खोदताना नेमका पाईपलाईन वर घाव घातला जात आहे. मागच्या आठवड्यात आठवडी बाजाराजवळ जिओच्या कामगारांनी पाईपलाईन फोडली होती. त्यामुळे काही परिसरात दोन दिवस नागरिकांना पाण्यासाठी कामकाजावर भटकंती करावी लागली होती. नगरपालिकेच्या नागरिकांनी सडकुन टीका केली होती. पाइपलाइन दुरुस्त झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी नागरिकांना पाणी मिळाले. आपण संबंधितांना पत्र देऊ असे त्यावेळी धीरजकुमार गोहाड यांनी म्हटले होते.

सदर घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा सदर कर्मचाऱ्यांनी वाघामाता परिसरात केबल टाकताना दुसऱ्यांदा पाईप फोडली. त्यामुळे शहरवासीयांना रविवार आणि सोमवारी पाणी मिळाले नाही. मंगळवारीसुद्धा पाणी कमीच पुरविण्यात आले. शहरातील ९० टक्के पेक्षा जास्त नागरीक नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. याशिवाय शहरात पाण्याचे दुसरे स्त्रोत नाही. अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने पाईप लाईन फोडण्याची कामे करून शहरवासीयांना पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिओ कंपनीला राज्य सरकारची परवानगी आहे. परवानगी आहे तर त्यांनी पाईपलाईन फोडावी का, त्यांना पाईपलाईन नगरपालिकेकडून बाबात पाणीपुरवठा विभागाचे मार्गदर्शन का होत नाही, त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला असल्याने त्यांचेवर एफ आय आर का दाखल केला नाही, प्रस्तुत प्रतिनिधीने विचारलेल्या या प्रश्नांवर ते म्हणाले, दिवाळीपर्यंत त्यांचे काम थांबवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande