पिंपरी पोलिसांकडून तब्बल २३ कोटी ३० लाखांचा गांजा आणि मेफेड्रोन ड्रग्स नष्ट
पिंपरी, 1 ऑक्टोबर (हिं.स.) पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तब्बल २३ कोटी ३० लाखांचा गांजा आणि मेफेड्रोन ड्रग्स नष्ट केले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून करण्यात आलेल्या कारवाईनंतर ६६२ किलो गांजा आणि २० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं होतं. एकूण ९० गुन्ह
पिंपरी पोलिसांकडून तब्बल २३ कोटी ३० लाखांचा गांजा आणि मेफेड्रोन ड्रग्स नष्ट


पिंपरी, 1 ऑक्टोबर (हिं.स.) पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तब्बल २३ कोटी ३० लाखांचा गांजा आणि मेफेड्रोन ड्रग्स नष्ट केले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून करण्यात आलेल्या कारवाईनंतर ६६२ किलो गांजा आणि २० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं होतं. एकूण ९० गुन्ह्यातील हा मुद्देमाल होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी मानली जाते. इथं देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून नागरिक आपली स्वप्न घेऊन आलेला आहे. मोठ्या मोठ्या कंपनी, नामांकित शाळा, कॉलेज, विद्यालये आहेत. छोटे -मोठे उद्योग आहेत. परंतु, हीच तरुण पिढी, कामगार व्यसनाला दूर ठेऊ शकला नाही. यातील काही प्रमाणात नशेच्या आहारी देखील गेलेली आहे. कॉलेज, महाविद्यालयीन परिसरात गांजा, मेफेड्रोन विक्री केली जात असल्याचं आणि त्यांना पोलिसांनी पकडल्याचे अनेकदा प्रकरण समोर आलेलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande