नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात सांगितले की, अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेली विजयादशमी आपल्याला सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. राष्ट्रपतींनी सांगितले की, देशाच्या विविध भागात रावण दहन आणि दुर्गा पूजा म्हणून साजरा होणारा हा सण आपल्या राष्ट्रीय मूल्यांचे प्रतिबिंबित करतो. तो आपल्याला राग आणि अहंकार यासारख्या नकारात्मक प्रवृत्तींचा त्याग करून धैर्य आणि दृढनिश्चयासारख्या सकारात्मक प्रवृत्तींना स्वीकारण्यास देखील शिकवतो.
राष्ट्रपतींनी अशी इच्छा व्यक्त केली की, हा सण आपल्याला असा समाज आणि देश निर्माण करण्यास प्रेरित करेल जिथे सर्व लोक न्याय, समानता आणि सौहार्दाच्या आदर्शांनी प्रेरित होऊन एकत्र पुढे जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule