पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकाची फेसलेस सेवा सुरु
पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नविन वाहनांसाठी पसंतीचे, आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सोय आता पूर्णपणे ऑनलाईन व फेसलेस पध्दतीने करण्यात आली आहे. सदर सेवा दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पासून कार्यान्वित असून अर्जदारास कार
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकाची फेसलेस सेवा सुरु


पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नविन वाहनांसाठी पसंतीचे, आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सोय आता पूर्णपणे ऑनलाईन व फेसलेस पध्दतीने करण्यात आली आहे. सदर सेवा दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पासून कार्यान्वित असून अर्जदारास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

नवीन मालिका एमएच 12 वायआर मधील पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सेवा दिनांक ०१ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता सुरु होणार आहे. कार्यालयामध्ये ऑफलाईन पध्दतीने कोणतेही शुल्क स्विकारले जाणार नाही.

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून OTP च्या साहाय्याने लॉगिन करावे, पसंतीचा क्रमांक निवडावा आणि SBI e-pay गेटवेच्या माध्यमातून ऑनलाईन शुल्क भरावे. त्यानंतर ई-रसीद प्रिंट करून संबंधित वाहन विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. ही सोय वैयक्तिक मालकीच्या वाहनांकरिता उपलब्ध असून इतर प्रकारच्या (Company, Firm इ.) वाहनांसाठी पसंती क्रमांक कार्यालयामार्फतच जारी करण्यात येतील. असे उप प्रादेशिक अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande