आरबीआयचा दिलासा; रेपो रेट ५.५ टक्क्यांवर स्थिर
मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले की रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. सध्या लागू असलेला ५.५ टक्के रेपो रेट कायम ठेवण्यात
RBI


मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले की रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. सध्या लागू असलेला ५.५ टक्के रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन किंवा वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल होणार नाही आणि कर्जदारांचा ईएमआय वाढणार नाही.

गेल्या तीन दिवसांपासून पतधोरण समितीची बैठक सुरू होती आणि आज या बैठकीचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी गव्हर्नरांनी या निर्णयाची घोषणा केली. यामुळे लाखो कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. उदाहरणार्थ, जर ६० लाख रुपयांचे कर्ज ८.५ टक्के व्याजदराने घेतले असेल, तर त्यावर ५२,०२६ रुपयांचा ईएमआय भरावा लागतो. रेपो रेटमध्ये बदल न झाल्याने हा ईएमआय ना वाढणार, ना कमी होणार आहे.

रेपो रेट हा कर्जावरील व्याजदर ठरवणारा मुख्य घटक असून, आरबीआय दर तीन महिन्यांनी तो जाहीर करते. सर्व बँकांना हा दर फॉलो करावा लागतो आणि त्यावर आधारित कर्जाचे हप्ते निश्चित केले जातात. त्यामुळे रेपो रेट स्थिर राहिल्याने कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे.

मागील वर्षभरात मात्र रेपो रेटमध्ये तीन वेळा कपात करण्यात आली होती. त्यामुळे एकूण १०० बेसिस पॉइंट्स म्हणजेच एक टक्क्यांनी दर कमी झाला होता. वर्षाच्या सुरुवातीला ६.५ टक्के असलेला रेपो रेट आता ५.५ टक्क्यांवर आणला गेला असून तोच दर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande