अमरावतीमध्ये कुंटणखान्यावर छापा; दोन महिलांसह चार तरुणी ताब्यात
अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील प्रसाद कॉलनी येथील सिद्धीश्री अपार्टमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या कुंटणखान्यावर धाड टाकून दोन महिलांसह चार तरुणींना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई गुन्हे
प्रसाद कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये कुंटणखान्यावर छापा –दोन महिला, चार तरुणी ताब्यात


अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील प्रसाद कॉलनी येथील सिद्धीश्री अपार्टमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या कुंटणखान्यावर धाड टाकून दोन महिलांसह चार तरुणींना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुन्हे शाखेने डमी ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील दोन वेगवेगळ्या फ्लॅट्सवर छापा टाकला. यावेळी प्रथम मजल्यावरील फ्लॅटमधून एक महिला आणि दोन तरुणी, तसेच दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून दुसरी महिला आणि दोन तरुणी ताब्यात घेण्यात आल्या.प्राथमिक चौकशीत, या महिलांनी मागील वर्षभरापासून स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट्समध्ये देहव्यापार चालविल्याचे उघड झाले आहे. तसेच, गुन्हे शाखेकडून संबंधित महिलांचे मोबाईल क्रमांक आणि ग्राहकांची माहिती गोळा करून पुढील तपास सुरू आहे. अमरावती पोलिसांकडून शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या अवैध कुंटणखान्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. सदर कारवाई पोलीस आयुक्त अरविंद वावरीया, उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, शाम घूगे व सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि अमोल कडू, अंमलदार जहीर शेख, मनोज ठोसर, अतुल संभे, संग्राम भोजने, राहुल देंगेकार, राहुल दूधे व महिला अंमलदार वर्षा घोंगळे यांनी पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande