धाराशिव जिल्ह्यातील 1373 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची मदत
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत घरदार,संसार उध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून दिलासा मिळू लागला आहे.पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या एकूण १३७३ कुटुंबांना मागील दोन दिव
अ


छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत घरदार,संसार उध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून दिलासा मिळू लागला आहे.पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या एकूण १३७३ कुटुंबांना मागील दोन दिवसात प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत वाटप करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण ३२०६ कुटुंबे पुराच्या पाण्याने बाधित असून त्यांना मदतीसाठी पात्र धरले गेले आहे. यामध्ये धाराशिव २१७, तुळजापूर १०५,उमरगा २५०,कळंब ४१३,भूम ७१२,परंडा १४०० आणि वाशी १०९ कुटुंबांचा समावेश आहे.

३५३ कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली.यामध्ये धाराशिव ६५,कळंब २०८ व परंडा ८० कुटुंबांचा समावेश आहे.तर ३० सप्टेंबर रोजी १०२० कुटुंबांना दिलासा देण्यात आला.त्यामध्ये धाराशिव ५०,कळंब ४०,भूम ५०८, परंडा ३१३ व वाशी १०९ कुटुंबांचा समावेश आहे.

या दोन दिवसांत धाराशिव तालुक्यातील ११५,कळंब २४८,भूम ५०८,परंडा ३९३ व वाशी १०९ कुटुंबांना प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे.

पूराच्या पाण्याने उध्वस्त झालेल्या संसाराला पुन्हा उभारी देण्यासाठी ही आर्थिक मदत दिलासादायक ठरत आहे.प्रशासनाकडून उर्वरित पात्र कुटुंबांनाही लवकरच मदत पोहोचवली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande