नाशिक जिल्ह्यात भातावरती मावाचा प्रादुर्भाव
नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.)मागील आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर आता जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये महत्त्वपूर्ण पीक असणाऱ्या भातावरती मावा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे आधीच पावसाने वाया गेलेले भात पीक आता शेतकऱ्यांच्या हातातून पूर्णपणे जाण
जिल्ह्यात भातावरती मावाचा प्रादुर्भाव , शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ


नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.)मागील आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर आता जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये महत्त्वपूर्ण पीक असणाऱ्या भातावरती मावा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे आधीच पावसाने वाया गेलेले भात पीक आता शेतकऱ्यांच्या हातातून पूर्णपणे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ हरसुल सुरगाणा व दिंडोरी आणि लगतच्या परिसरामध्ये प्रामुख्याने पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये भात शेती केली जाते विशेष म्हणजे यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केली त्यानंतर सर्वसाधारण महिनाभर पाऊस उघडला आणि पुन्हा पाऊस सुरू झाला तशी आदिवासी भागामध्ये भात शेतीला सुरुवात झाली शेतकऱ्यांनी यावेळी पाऊस चांगला असल्याने भात शेतीला प्राधान्य दिले भाताबरोबरच नागली वरई या आदिवासी भागातील पिकांनाही या भागातील शेतकरी प्राधान्य देत होते पण नंतर म्हणजेच ऑगस्ट अखेर पासून सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात शेतीला धुऊन काढले त्यामुळे भातशेती चांगलीच नष्ट झाली आता उरलेसुरली भात शेती वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असतानाच विविध रोगांचा प्रादुर्भाव देखील सुरू झाला आहे

त्र्यंबकेश्वर भागात भात शेतीमध्ये मोठे नुकसान झालेले असताना काही ठिकाणी असे नुकसान नसले तरी पावसाने मावा रोग पडल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या नियमात पाच पिकांचा रोग बसत नाही तर विमा कंपनी देखील भात पीक रोग क्लेम धरत नाही. कृषी विभागाने बाजारातून या पद्धतीची औषधे घ्या, किटक नाशक फवारणी करा एवढे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी अजूनच हवाल दिल झाला असून कृषी विभाग ही व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही आणि पीक वाया गेलं तर विमा कंपनी पैसे देणार नाही अशा परिस्थितीमध्ये भात पिकाचे नुकसान कसे टाळावे. या विमंचनेत सध्या जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामधील शेतकरी दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande