नाशिक, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।- नाशिकच्या सुप्रसिद्ध संदीप विद्यापीठाला नॅक ‘A’ ग्रेड मानांकन मिळाले आहे.हे मानांकन म्हणजे शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थीभिमुख विविध उपक्रमांची पावती असल्याचे प्रतिपादन संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.संदीप झा यांनी केले.ते म्हणाले 2017 मध्ये स्थापन झालेल्या संदीप विद्यापीठाने मुल्याधिष्ठित व परिणामआधारित शिक्षण यावर लक्ष केंद्रित केले असून 100 टक्के प्लेसमेंट असिस्टंस सोबतच स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शनाची कवाडे उघडी केली आहेत.
नॅक मानांकनाबाबत बोलतांना ते म्हणाले की हे मानांकन मिळविण्यासाठी विविध स्तरावरील प्रक्रियेतून जावे लागते.मुख्यत्वेकरून पुढील निकष याकरिता विचारात घेतले जातात. या निकषांमध्ये अभ्यासक्रम,संशोधन,प्राध्यापकवृंद ,त्यांच्या शिकविण्याच्या व परिक्षा पद्धती ,विद्यार्थीसेवा ,समाजामध्ये संस्थेची प्रतिमा ,प्लेसमेंट्स हे निकष आहेत.या सर्व निकषांवर खरे उतरल्यानंतरच हे मानांकन मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले संदीप विद्यापीठामध्ये कालानुरूप तसेच उद्योगांना आवश्यक अभ्यासक्रम डिझाईन केला जातो.याकरिता विविध क्षेत्रातील तज्ञांची समिती कार्यरत असते.आय आय आय सेल म्हणजेच इंडस्ट्री ,इन्स्टिट्यूट,इंटरअॅक्शन यामुळे लेटेस्ट ट्रेंड्स अभ्यासक्रमात समाविष्ट करणे शक्य होते.यामुळे इथून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सर्व निकषांवर खरा उतरतो.याचा परिणाम म्हणून 24 लाखांपासून ते दीड कोटींपर्यंत पॅकेजेसच्या नोकऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मिळाल्या असून असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.
सध्या संदीप विद्यापीठात अभियांत्रिकीमधील विविध स्पेशलायझेशन ,कॉमर्स अँड मॅनेजमेंट,कॉम्प्युटर सायन्सेस ,फार्मसी ,लाॅ,विज्ञान व डिझाईन ,फॅशन ,ब्युटी,कॉस्मेटॉलॉजी याबाबतचे पदवी कोर्सेस उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV