तुळजापूर मंदिर परिसरातून ७ बाल भिक्षेकरांची सुटका
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। तुळजापूर मंदिर परिसरातून ७ बाल भिक्षेकरांची सुटका करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नवरात्रीत मोठी कारवाई केली आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर मंदिरात जमलेल्या भाविकांच्या गर्दीत जिल्हा महिला व बाल व
तुळजापूर मंदिर परिसरातून ७ बाल भिक्षेकरांची सुटका


छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। तुळजापूर मंदिर परिसरातून ७ बाल भिक्षेकरांची सुटका करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नवरात्रीत मोठी कारवाई केली आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर मंदिरात जमलेल्या भाविकांच्या गर्दीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण मोहीम राबवली. या 'बाल भिक्षेकरी पुनर्वसन रेस्क्यू मोहिमे'अंतर्गत मंदिर परिसरातून एकूण ७ बालकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत ही कारवाई दोन सत्रांमध्ये करण्यात आली. सकाळच्या सत्रात ३ आणि दुपारच्या सत्रात ४ अशा एकूण ७ मुलांना भिक्षेकरी वृत्तीतून बाहेर काढण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना पुढील कारवाईसाठी धाराशिव येथील बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.

ही मोहीम प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जिल्हा संरक्षण अधिकारी भुजंग भोसले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण, वन स्टॉप सेंटरच्या समन्वयक प्रियंका जाधव यांच्यासह बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी, पोलीस विभाग, मंदिर सुरक्षा रक्षक आणि युवा ग्राम विकास मंडळाचे प्रतिनिधी संतोष रेपे यांचा सक्रिय सहभाग होता.

या यशस्वी मोहिमेमुळे बाल भिक्षेकरींच्या पुनर्वसनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande