अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)धम्मचक्र प्रवर्तन दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारल्याचा ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी त्यांचे अनुयायी अभिवादन करतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे २० विशेष फेऱ्या करणार आहे.
नागपूर-अकोला विशेष रेल्वे क्र. ०११३२ ही २ ऑक्टोबरला नागपुरातून ६.४० वाजता सुटेल आणि अकोला येथे त्याच दिवशी ११.३० वाजता पोहोचेल. तसेच ०११३१ ही विशेष गाडी ३ रोजी अकोला येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी पहाटे ४.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटी-नागपूर अनारक्षित विशेष गाडी क्र. ०१०१९ ही १ ऑक्टोबरला मुंबईतून दु.२.३० वाजता सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१०२० ही २ रोजी नागपूरहून रात्री १०.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी ५.२० वाजता पोहोचेल.
पुणे- नागपूर अनारक्षित गाडी क्र.०१२१५ ही १ ऑक्टोबरला पुणे येथून २.५० वाजता सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी स. ७.३० वाजता पोहोचेल. ०१२१६ ही २ रोजी नागपूर येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी ४.२० वाजता पोहोचेल. सोलापूर- नागपूर गाडी क्र. ०१०२९ ही १ रोजी सोलापूर येथून स.९.५० वाजता सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१०३० अनारक्षित विशेष रेल्वे २ ऑक्टोबरला नागपूरहून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि सोलापूरला दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.
नागपूर-भुसावळ अनारक्षित विशेष गाडी ६ फेऱ्या करणार असून ०१२१४ ही १,२ व ३ ऑक्टो.रोजी नागपूर येथून रात्री ९.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे पुढील दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्र. १२११३ ही २,३ व ४ रोजी भुसावळ येथून पहाटे ५ वाजता सुटेल आणि नागपूरला १२.२० वाजता पोहोचेल. नाशिक रोड-नागपूर मेमू २ फेऱ्या करणार असून गाडी क्र. ०१२३१ ही १ ऑक्टोबरला नाशिक रोड येथून ६ वाजता सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी स.८ वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्र. ०१२३२ अनारक्षित मेमू २ रोजी नागपूरहून दु. ४.२० वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. नाशिक रोड- नागपूर मेमू क्र. ०१२३३ ३ व ४ रोजी नाशिक रोड येथून पहाटे ४.१५ वाजता सुटेल आणि नागपूरला दु.३.४० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२३४ ही ३ व ४ रोजी नागपूरहून दु. ४.२० वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी