'स्वच्छताही सेवा' पंधरवड्यात ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छतोत्सव
ठाणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकभरापूर्वी स्वच्छतेचा संस्कार रुजावा यासाठी केलेल्या हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे देशभरात स्वच्छतेची चळवळ उभी रहात आहे. समूहाने एकत्र येऊन स्वच्छता करणे आणि ती टिकवणे हा या चळवळीचा मूल
'स्वच्छताही सेवा' पंधरवड्यात ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छतोत्सव


ठाणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकभरापूर्वी स्वच्छतेचा संस्कार रुजावा यासाठी केलेल्या हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे देशभरात स्वच्छतेची चळवळ उभी रहात आहे. समूहाने एकत्र येऊन स्वच्छता करणे आणि ती टिकवणे हा या चळवळीचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत आमदार संजय केळकर सहभागी झाले होते.

स्वच्छताही सेवा या पंधरवड्याची सांगता ०२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने होत आहे. या पंधरवड्यात ठाणे महापालिकेतर्फे विविध भागात 'स्वच्छतोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि येऊर गाव येथे सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात स्वयंसेवी संघटनांसह, शालेय विद्यार्थीही सहभागी झाले.

आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, नागरिक या सफाई मोहिमेत सहभागी झाले. सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण याची महती सांगणारे पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आले.

येऊरमध्येही स्वच्छतोत्सव

स्वच्छता ही सेवा आणि वन्य जीव सप्ताह यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका आणि येऊन वन परिक्षेत्र विभाग यांनी येऊर गावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर

स्वच्छताही सेवा या उपक्रमात सफाई मित्रांसाठी आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. त्यात, बुधवारी, सफाई कर्मचाऱ्यांसाठी हेपिटायटीस बी लसीकरण मोहिमेचा आरंभ वर्तरनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आला. गुरूकृपा फाऊंडेशनच्या मदतीने ही लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. ही मोहिम वर्षभर चालणार असून सर्व सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. इथेच मॅमोग्राफी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande