छ. संभाजीनगर : आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकानिहाय बैठक
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आजी, माजी सैनिक व त्यांच्या अवलं‍बिताच्या अडी-अडचणी सोडविण्याकरीत
छ. संभाजीनगर : आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकानिहाय बैठक


छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आजी, माजी सैनिक व त्यांच्या अवलं‍बिताच्या अडी-अडचणी सोडविण्याकरीता दर सहा महिन्यांनी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी,पोलीस अधिकारी, माजी सैनिक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या गठीत समितीची होणारी बैठक तालुका पातळीवर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित गावाच्या तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय बैठकांचे नियोजन याप्रमाणे- मंगळवार दि.७ ऑक्टोंबर ता.सिल्लोड, वेळ दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय, सिल्लोड,

शुक्रवार दि.१०ऑक्टोंबर ता. पैठण, वेळ दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय, पैठण,

मंगळवार दि.१४ऑक्टोंबर ता. सोयगाव वेळ दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय, ता. सोयगाव, गुरुवार दि.३० ऑक्टोंबर ता. गंगापूर वेळ दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय, ता.गंगापूर,

छत्रपती संभाजीनगर व संबंधित तालुक्यातील आजी व माजी सैनिकांनी बैठकीच्या रोजी वेळेवर दिलेल्या ठिकाणी हजर रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. अधिक माहिती साठी दुरध्वनी क्र. ०२४० – २३७०३१३ येथे संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande