यूपीएससी 2025च्या आयईएस आणि आयएसएसचे निकाल जाहीर
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 2025 च्या आयईएस (भारतीय आर्थिक सेवा) आणि आयएसएस (भारतीय सांख्यिकी सेवा) परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. देशभरातील हजारो उमेदवारांच्या कष्टाला यश मिळाले असून मोहित अग्रवाल नदबईवाला य
UPSC 2025 IES and ISS


UPSC 2025 IES and ISS results


नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 2025 च्या आयईएस (भारतीय आर्थिक सेवा) आणि आयएसएस (भारतीय सांख्यिकी सेवा) परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. देशभरातील हजारो उमेदवारांच्या कष्टाला यश मिळाले असून मोहित अग्रवाल नदबईवाला यांनी आयईएसमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

युपीएससीच्या माहितीनुसार, आयईएस 2025 परीक्षेसाठी जानेवारीत लेखी परीक्षा झाली होती आणि नंतर सप्टेंबरमध्ये मुलाखत व व्यक्तिमत्व परीक्षण संपन्न झाले. निकालानुसार आयईएस पदासाठी एकूण 12 उमेदवारांची निवड झाली आहे. मोहित अग्रवाल नदबईवाला देशात पहिले स्थान मिळवणारे उमेदवार ठरले. ऊर्जा रहेजा दुसऱ्या स्थानावर असून गौतम मिश्रा तिसऱ्या स्थानी आहेत.

त्याचप्रमाणे, आयएसएस 2025 परीक्षेत कशिस कसाना यांनी पहिले स्थान मिळवले आहे. आकाश शर्मा दुसऱ्या आणि शुभेंदू घोष तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या वर्षी, आयईएसमध्ये १२ उमेदवारांची आणि आयएसएसमध्ये ३५ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. १२ आयईएस पदे आणि ३५ आयएसएस पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात आली.युपीएससीने सांगितले की, उमेदवारांची नियुक्ती मूळ कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच निश्चित केली जाईल. इच्छुक उमेदवार upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल तपासू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande