येरवडा : उर्मिला कोठारेनं महिला कैद्यांसोबत साजरी केली नवरात्री
पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : उर्मिला कोठारे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सरदेखील आहे.उर्मिला सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाह
उर्मिला कोठारे


पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : उर्मिला कोठारे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सरदेखील आहे.उर्मिला सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतीच तिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

उर्मिला कोठारेनं येरवडा जेलमधील महिला कैद्यांसोबत नवरात्र उत्सव साजरा केला. महिला कैद्यासोबत नवरात्र उत्सव साजरा करण्याचा अनुभव तिनं पोस्टमधून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. उर्मिलाने पारंपरिक निळ्या साडीतील सुंदर लूक असलेले फोटो शेअर केले आहेत. या उत्सवात महिला कैद्यांसोबत हसणे आणि आनंद वाटण्याचा अनोखा अनुभव तिला घेता आला. कैद्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद पाहून अभिनेत्री स्वतःही भावूक झाली. हा अनुभव तिला खऱ्या अर्थाने उत्सवाची खरी ओळख समजून देणारा ठरला, असे तिने सांगितले.

उर्मिलाने कॅप्शनमध्ये लिहिले, आज नवरात्र उत्सव येरवडा जेलच्या महिला कैद्यांसोबत साजरा करण्याचा योग आला. त्यांच्या हसण्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या… आणि तीच खरी उत्सवाची ओळख. माहेर प्रतिष्ठानचे मनापासून आभार;... त्यांच्यामुळेच हा अनुभव जगता आला. दरम्यान, विविध सेवाभावी संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक, समुपदेशपर असे उपक्रम महिला कैद्यांसाठी राबविण्यात येतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande