१९ वर्षांखालील युवा कसोटी सामना : वैभव सूर्यवंशीची झंझावती शतकी खेळी
ब्रिस्बेन, १ ऑक्टोबर (हिं.स.) वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९ वर्षांखालील पहिल्या युवा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले आणि आपल्या संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. सूर्यवंशीचे शतक फक्त ७८ चेंडूत पूर्ण झाले. भारताने पहिल्
वैभव सूर्यवंशी


ब्रिस्बेन, १ ऑक्टोबर (हिं.स.) वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९ वर्षांखालील पहिल्या युवा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले आणि आपल्या संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. सूर्यवंशीचे शतक फक्त ७८ चेंडूत पूर्ण झाले. भारताने पहिल्या डावात ४२८ धावा केल्या . खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने १ बाद ८ धावा केल्या होत्या. तर सलामीवीर ऍलेक्स ली यंगला वेगवान गोलंदाज दीपेश देवेंद्रनने शून्य धावांवर बाद केले.

सूर्यवंशीने फक्त ८६ चेंडूत ११३ धावा केल्या. ज्यामध्ये ९ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याने एक षटकार आणि एक चौकारासह आपले शतक पूर्ण केले. त्याने ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. युवा कसोटी इतिहासात वेगवान शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. भारताचाच आयुष म्हात्रे 64 चेंडूत शतक झळकावत पहिल्या क्रमांकावर आहे.

सूर्यवंशी व्यतिरिक्त, वेदांत त्रिवेदीनेही शानदार फलंदाजी केली. त्याने १९२ चेंडूत १९ चौकारांसह १४० धावा केल्या. यामुळे भारताने त्यांच्या पहिल्या डावात ४२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात २४३ धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने ८ धावांत १ विकेट गमावली होती. तरीही ते भारतापेक्षा १७७ धावांनी मागे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande