छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे यांनी हिंगोणी, कांगोणी, लाखगंगा, बाबतारा, पुरणगाव, बाभूळगाव गंगा, नांदूरढोक या गावांना भेट देऊन पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली.
अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुराने वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये थैमान घातले. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या संकटाच्या काळात शासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शेतकरी व नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले.
यावेळी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आमदार अण्णासाहेब पा माने, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जराड स, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, तहसीलदार सुनील सावंत , शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis