सोलापूर : वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर मार्फत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रम जसे वृक्ष दंडी, सायकल रॅली, वृक्षारोपन व स्वच्छता विविध शालेय स्पर्धा, प्रश्न मंजुषा, स्पर्धा पर
bsjsj


सोलापूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर मार्फत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रम जसे वृक्ष दंडी, सायकल रॅली, वृक्षारोपन व स्वच्छता विविध शालेय स्पर्धा, प्रश्न मंजुषा, स्पर्धा पर्यावरण विषयक कार्यशाळा, रक्तदान शिबीर इत्यादी राबविण्यात येणार आहे.

सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर व अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, एनटीपीसी सोलापूर, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, राष्ट्रीय हरित सेना शाळा यांच्या संयुक्त विद्यामानाने दि..01/10/2025 ते 07/10/2025 या कालावधीत वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम होतील असे, विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे यांनी कळवले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande