लातूर विलास बँकेकडून; सभासदांना ८ टक्के लाभांश
लातूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर येथील विलास को-ऑपरेटिव्ह बँक- सभासदांना ८ टक्के लाभांश तसेच कर्मचाऱ्यांना ८ टक्के बोनस देण्याची घोषणा आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. सर्वसामान्य जनता आणि तरुणांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवण्याचे काम करेल. बँकेन
अ


लातूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर येथील विलास को-ऑपरेटिव्ह बँक- सभासदांना ८ टक्के लाभांश तसेच कर्मचाऱ्यांना ८ टक्के बोनस देण्याची घोषणा आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. सर्वसामान्य जनता आणि तरुणांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवण्याचे काम करेल. बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारभारात काळानुरूप बदल घडवून आणले आहेत असे सांगून बँकिंग क्षेत्रात मोठी स्पर्धा असल्याने विलास को-ऑपरेटिव्ह बँकेने सुव्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण कारभार करावा, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. लातूर शहरातील विष्णुदास मंगल कार्यालय येथे विलास को-ऑपरेटिव्ह बँकेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी आमदार विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके आदीसह संचालक विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, बँकिंग क्षेत्रासाठी आता देशात खुली स्पर्धा आहे, त्यामुळे विलास को-ऑपरेटिव्ह बँक सुव्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण कारभार करून सर्वसामान्य जनता आणि तरुणांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवण्याचे काम करेल या बँकेने लातूर नंतर आता धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यात ही शाखा सुरू केल्या आहेत. आगामी काळात छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी शाखा सुरू करून बँकेचा विस्तार केला जाईल. जेथे लातूरचा माणूस मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे, तेथे बँकेची शाखा सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असेही यावेळी सांगितले. सभासदांना ८ टक्के लाभांश कर्मचाऱ्यांना ८.३३ % बोनस विलास को-ऑपरेटिव बँक नफ्यात चालत असल्यामुळे यावर्षी सभासदांना ८ टक्के लाभांश दिला जाईल त्यासोबतच कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेता त्यांनाही ८.३३ % बोनस देण्यात येईल असे यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी जाहीर केले. सभेत प्रस्तावीक करतांना चेअरमन किरण जाधव म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील सहकारी बँकांच्या क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या विलास बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ मे २००३ पासून झाला. बँक स्थापनेपासून आजपर्यंत बेरोजगार युवक, व्यापारी, उद्योजक व शेती पूरक व्यवसायिक सभासदांची आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टीने बँकेने धोरण राबविले आहे. लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे विचार आणि सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांची प्रेरणा व संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेची गेल्या २४ वर्षाची वाटचाल बँकासाठी पथदर्शी राहिलेली आहे, असे सांगून सभासद व भाग भांडवल, राखीव व इतर निधी, ठेवी, ठेवीवरील विमा, कर्जे, अग्रक्रम व दुर्बल घटकांना दिलेले कर्जे, गुंतवणूक, कर्ज वसुली/एनपीए, ऑडिट वर्ग, आदिची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विलास बॅक अधिमंडळाच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पन करुन दिपप्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande