अमरावती, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)आमदार रवी राणा यांनी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करत नाव न घेता माजी आमदार बच्चू कडूंवर थेट टीका केली.आपल्या जिल्ह्यातील टपोरी लोकांची संपत्तीची यादी आमच्याकडे आहे. जे स्वतःला शेतकरी नेते म्हणवतात, त्यांनी आपल्या संपत्तीपैकी किमान १० टक्के रक्कम शेतकऱ्यांसाठी द्यावी. तेव्हा खरी माणुसकी दिसेल, असे रवी राणा यांनी ठणकावले.
ते पुढे म्हणाले, तुम्ही मंत्री होता, राज्यभर गॅंग घेऊन फिरताय, पण शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी थांबवा. माणुसकी असेल तर मदत करा.अशी टीका बच्चू कडू यांचे नाव न घेता आ.रवी राणा यांनी केली.
दरम्यान, भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला.उद्धव ठाकरेंकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, त्यातील वाटा शेतकऱ्यांसाठी द्यावा. फक्त दसऱ्याच्या मेळाव्यात टोमणे मारण्यात वेळ घालवू नये, अशी टीका त्यांनी केली.त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, मुख्यमंत्री असताना त्यांच्या पायाला कधीही चिखल लागला नाही! असेही नवनीत राणा म्हणाल्यात.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी