लातूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।
भारतीय जनता पक्ष लातूर देशातील नेते माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर आणि भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे
श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जे.एस.पी.एम संस्था, लातूर यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपये इतक्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला.
लातूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके जलमय झाली असून घरांचे, मालमत्तेचे आणि उपजीविकेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सर्वांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गोरगरीब जनतेसह बळीराजा नक्कीच या आपत्तीवर मात करून नव्या जोमाने उभारी घेईल, असा दृढ विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis