जिल्हा बँकेच्या “दगडी बँक’ इमारतीच्या विक्रीला एकनाथ खडसेंचा विरोध
जळगांव, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीपेठ शाखेच्या “दगडी बँक” म्हणून प्रसिद्ध ब्रिटिशकाळीन इमारतीच्या विक्रीविरोधात शेतकरी संचालक आ. एकनाथराव खडसे यांनी विरोध नोंदवला आहे. ही इमारत १९२७ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने खरेदी क
जिल्हा बँकेच्या “दगडी बँक’ इमारतीच्या विक्रीला एकनाथ खडसेंचा विरोध


जळगांव, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीपेठ शाखेच्या “दगडी बँक” म्हणून प्रसिद्ध ब्रिटिशकाळीन इमारतीच्या विक्रीविरोधात शेतकरी संचालक आ. एकनाथराव खडसे यांनी विरोध नोंदवला आहे. ही इमारत १९२७ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने खरेदी केली होती आणि जळगांवमधील शेतकऱ्यांच्या परिश्रम व भावनांशी जोडलेली आहे.त्यामुळे हि इमारत विक्रीस काढू नये असे पत्र त्यांनी बँकेचे चेअरमन संजय पवार यांना दिले आहे. पत्राद्वारे एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे की, बँकेच्या आर्थिक स्थितीला पाहता सध्यातरी इमारत विकण्याची गरज नाही आणि ऐतिहासिक वारसा असलेली ही वास्तू विकण्याचे निर्णय चुकीचे आहे. संचालक मंडळाच्या सभेत ते उपस्थित राहू शकणार नसल्यामुळे, त्यांनी पत्राद्वारे विक्रीविरोधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande