पुण्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन
पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळात सुस्थितीत जीवन व्यतीत करता यावे, तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, या उद्देशाने ऑक्टोंबर महिना राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून
पुण्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन


पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळात सुस्थितीत जीवन व्यतीत करता यावे, तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, या उद्देशाने ऑक्टोंबर महिना राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

याचे औचित्य साधून दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण पुणे विभाग व सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे “ज्येष्ठ नागरिक दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व युवक यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. तसेच, समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर-सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव करण्यात येईल.

यावेळी सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक व संबंधित संघटनांना कार्यक्रमास व आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande