सोलापूरमध्ये पाच हजार कोरडा शिधा कीटचे वाटप
सोलापूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - माढा येथील प्रा. शिवाजीराव सावंत व राजवी ऍग्रो पावर प्रा. लिमिटेड यांच्यावतीने पूरग्रस्त बांधवांसाठी कोरडा शिधा असणारी पाच हजार कीट वाटप करण्यात आली. शिवाय पुराच्या काळामध्ये माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत व सर
सोलापूरमध्ये पाच हजार कोरडा शिधा कीटचे वाटप


सोलापूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - माढा येथील प्रा. शिवाजीराव सावंत व राजवी ऍग्रो पावर प्रा. लिमिटेड यांच्यावतीने पूरग्रस्त बांधवांसाठी कोरडा शिधा असणारी पाच हजार कीट वाटप करण्यात आली. शिवाय पुराच्या काळामध्ये माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत व सरपंच ऋतुराज सावंत यांनी स्वतः च्या बोटीच्या साह्याने अनेक वाकावकरांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी नेत जीवदान दिले.मागील काही दिवसांपासून सीना नदीकाठी असलेल्या पुरामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. वाकाव गावाला पाण्याचा चोहोबाजूने वेढा पडला होता. काही ग्रामस्थ वाड्या वस्त्यांवरती अडकून पडले होते.

प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, सावंत परिवारातील इतर सदस्य व काही ग्रामस्थांनी सावंत परिवाराकडे असलेल्या बोटीच्या सहाय्याने ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांना जीवदान दिले. दोन्ही पुरावेळी सावंत कुटुंबीयांनी हे काम केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande