सोलापूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टीत सर्वसामान्याचा आधारवढ असलेल्या रेशन प्रणालीकडे लाभार्थींशी पावसामुळे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या धान्यापासून अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. दुकानात मोठ्या प्राणात धान्य आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या धान्याला मुदत वाढ द्या, अन्यथा दुकानदारांना मोठा आर्थिक फटाक बसण्याची भिती रास्त भाव धान्य दुकानदार वा केरोसीन विक्रेता असोसिएशनच्या वतीने जिल्हापुुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्याकडे केली आहे.
राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे बर्याच जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे.पिकांचे नुकसान झालेले आहे. शेकडो गावे बाधित झालेली आहेत. सोलापूर जिल्ह्यावर अतिवृष्टीचा संकट कोसळले आहे. गावे पाणी खाली गेली आहेत. अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडल्याने त्यांना पुन्हा उभारी देण्याकरिता जागोजागी मदतीचा हात पुढे येत आहेत. त्यामुळे रेशन दुकानातील धान्याकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड