सोलापूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहरातील थकबाकीदारांना अभय योजना लागू केली होती. सर्व थकबाकी एकवट भरल्यास व्याज आणि शास्तीमध्ये शंभर टक्के सवलतीसाठी हा अखेरचा दिवस होता. या योजनेचा फायदा घेण्यासाठी थकबाकीदारांनी मध्यरात्रीपर्यंत रांगा लावल्या. त्यामुळे योजनेंंतर्गत महापालिकेच्या तिजोरीत एक दिवसात 8 कोटी जमा झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
शहरातील मिळकतदारांकडे 600 कोटींच्या आसपास थकबाकी असून त्यामध्ये 300 कोटी रुपये शास्ती आणि दंडाची रक्कम आहे. ही सर्व थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर होते.
1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर महापालिका या काळात आयुक्तांनी अभय योजनेची घोषणा केली होती. या कालावधीत सर्व थकबाकी एकत्रित भरल्यास व्याज आणि शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत दिली जात होती. योजनेचा शेवटचा दिवस होता. रात्री 12 वाजेपर्यंत मुुदत होती. थकबाकीदारांनी मध्यरात्रीपर्यंत रांगा लावून सलवलतीचा फायदा घेतला. एका दिवसात आठ कोटी रुपये करापोटी जमा झाले. चार कोटीच्या आसपास सवलत दिली आहे. या योजनेंतर्गत एका महिन्यात 50 ते 55 कोटी जमा झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड