अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके मदतीपासून वगळले; भाजपा आमदारांचा विभागीय आयुक्तांना निवेदन
अमरावती, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।ून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी ८ तालुक
अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके मदतीपासून वगळले; भाजपा आमदारांचा विभागीय आयुक्तांना निवेदन


अमरावती, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।ून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी ८ तालुक्यांचा समावेश न केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड आणि तिवसा मतदार संघाचे आमदार राजेश वानखडे यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांची भेट घेतली आणि वगळण्यात आलेल्या आठ तालुक्यांचा मदतीमध्ये समावेश करण्याची मागणी करत निवेदन दिले.आमदार अडसड आणि वानखडे यांनी स्पष्ट केले की, वगळण्यात आलेल्या तालुक्यांमध्येही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर अन्याय होऊ नये. सरकार सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरच या तालुक्यांचा मदतीमध्ये समावेश केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रताप अडसड, भाजपा आमदार –शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. वगळलेल्या तालुक्यांचा लवकरच मदतीमध्ये समावेश होईल, हे आम्ही विभागीय आयुक्तांकडे मागणी करत स्पष्ट केलं आहे.

राजेश वानखडे, भाजपा आमदार –शासनाकडे निवेदन दिलं असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande