गडचिरोली आयटीआयमध्ये ‘महिन्द्रा ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर’चा शुभारंभ
गडचिरोली, 10 ऑक्टोबर (हिं.स.) गडचिरोली येथील अल्पमुदत रोजगारक्षम कौशल्य अभ्यासक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने नुकतेच करण्यात आले. याअंतर्गत क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे
गडचिरोली आय.टी.आय.मध्ये ‘महिन्द्रा ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर’चा शुभारंभकरताना जिल्हाधिकारी


गडचिरोली, 10 ऑक्टोबर (हिं.स.)

गडचिरोली येथील अल्पमुदत रोजगारक्षम कौशल्य अभ्यासक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने नुकतेच करण्यात आले. याअंतर्गत क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे संस्थास्तरावरील प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत विश्वकर्मा प्रतिनिधी अतुल राचमलवार यांच्या हस्ते पार पडले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी सांगितले की, “रोजगारासाठी तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे. आय.टी.आय. गडचिरोली येथील सुविधा आणि प्रशिक्षणातून तरुणांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

‘महिन्द्रा ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर’चे उद्घाटन

या प्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आणि कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच गडचिरोली आय.टी.आय.मध्ये महिन्द्रा ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले.

या केंद्रात अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण सुविधा, कुशल प्रशिक्षक, तसेच प्रशिक्षणार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. एकूण ३० प्रशिक्षणार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण आजपासून सुरू झाले.

अल्पमुदतीच्या कौशल्य अभ्यासक्रमांना प्रारंभ

संस्थेत पुढील रोजगारक्षम अभ्यासक्रमांचाही शुभारंभ झाला –

सेल्फ एम्प्लॉएड टेलर (महिलांसाठी), ब्युटी थेरपिस्ट (महिलांसाठी), डाटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर ट्रेनर, फ्रीज व एसी टेक्नीशियन, एलईडी लाईट रिपेअरिंग, टू व्हिलर सर्व्हिस असिस्टंट आणि असिस्टंट मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग.

याप्रसंगी प्राचार्य सुरेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणातून जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षणाचा अधिकाधिक फायदा घेण्याचे आवाहन केले., कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्त्व आणि कौशल्य विभागामार्फत मिळणाऱ्या सहाय्याविषयी सविस्तर माहिती दिली. संस्थेचे गटनिदेशक श्रीधर बावनकर यांनी विश्वकर्मा प्रतिनिधींच्या माध्यमातून उद्घाटनामागील पंतप्रधानांचा उद्देश स्पष्ट केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande