रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव
अहमदाबाद, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज रवींद्र जडेजा यांचे कौतुक करत त्यांना आपला ‘गुरू’ असल्याचं म्हटलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी साम
कुलदीप यादव


अहमदाबाद, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज रवींद्र जडेजा यांचे कौतुक करत त्यांना आपला ‘गुरू’ असल्याचं म्हटलं आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना कुलदीप यांनी सांगितले, “सही लेंथवर (योग्य लांबीवर) चेंडू टाकणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही पाहू शकता की जडेजा माझ्या बरोबर आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून ते माझे गुरु आहेत. मी आशिया कपमध्ये आणि येथेही चांगली कामगिरी करत आहे. फक्त सही लेंथवरच चेंडू टाकतोय. जेव्हा तुम्ही सही लेंथवर चेंडू टाकता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही चांगली गोलंदाजी करत आहात. मी आणि जडेजा बहुधा क्रिकेटशी संबंधित खूप चर्चा करत नाही, पण हो, त्यांच्या आजूबाजूला असणं छान आहे.”

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान चालू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथे झाला होता. या सामन्यात या दोन्ही गोलंदाजांनी अतिशय जबरदस्त कामगिरी करत आठ विकेट घेताना भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तसेच जडेजाने फलंदाजीत उत्तम काम करत नाबाद 104 धावा केल्या होत्या आणि ते सामन्याचे “प्लेयर ऑफ द मॅच” निवडले गेले.

वेस्ट इंडीजविरुद्ध चालू कसोटी मालिकेत कुलदीप यादवने मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकला आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यात त्याला एकदाही मैदानावर येण्याची संधी मिळाली नव्हती. पण घरच्या मैदानावर संधी मिळाली तेव्हा त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध चालू कसोटी मालिकेपुर्वी संपलेल्या आशिया कपमध्येही त्यांच्या कामगिरीने जलवा दाखवला. त्यांनी संघासाठी १४–१७ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामुळे त्यांना वेस्ट इंडीज मालिकेसाठी संधी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande