छत्रपती संभाजीनगर - खा.भुमरे यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत विकासात्मक कामांसाठी एक बैठक संपन्न झाली. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच
अ


छत्रपती संभाजीनगर, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत विकासात्मक कामांसाठी एक बैठक संपन्न झाली. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नॅशनल हायवे विभाग, नगर विकास विभाग तसेच ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, पूल, यासह अनेक महत्त्वाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल बांधकामांच्या पूर्णतेसाठी सूचना केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande