बीड, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी पालकासह आमची देखील आहे. ती योग्य प्रकारे निश्चितपार पाडू असं ठाम आश्वासन नवगण शिक्षण संस्थेच्या संचालिका सारिका क्षीरसागर यांनी दिले आहे.
बीड शहरातील के.एस.के.महाविद्यालय येथे विद्यार्थी,शिक्षक,पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बीड येथील नवगण शिक्षण संस्थेच्या संचालिका सारिका क्षीरसागर यांनी उपस्थित राहुन संवाद साधला. यावेळी बोलत होत्यापालकांनी आपल्या मुलावर योग्य ते संस्कार केल्यास विद्यार्थी हे त्याचे अनुकरण करत असतात.महाविद्यालय म्हणुन आमच्या संस्थेची काही जबाबदारी आहे जी आम्ही योग्य प्रकारे,पार पाडू. असे सारिका क्षीरसगर यांनी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक वृंद,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis