सोलापूर - तेलगाव, खानापूर, कुसूर गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती
सोलापूर, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। भीमा नदीकाठी असलेली तेलगाव, खानापूर आणि कुसूर ही गावे दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीचा विचार करून या गावांच्या पुनर्वसनसाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यात या गावांच्या पुनर्वसनाला गती देण्याचा महत्त्व
सोलापूर - तेलगाव, खानापूर, कुसूर गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती


सोलापूर, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। भीमा नदीकाठी असलेली तेलगाव, खानापूर आणि कुसूर ही गावे दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीचा विचार करून या गावांच्या पुनर्वसनसाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यात या गावांच्या पुनर्वसनाला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.

पूरकाळात आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 4 मोटार बोटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात पूरस्थिती हाताळण्यासाठी मदत होणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरप्रवण भागांचा सविस्तर आढावा घेण्यात आली. पूरग्रस्त बाधित नागरिकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

यंदा सप्टेंबर महिन्यात सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने त्याचा फटका महापूर आल्याने 82 गावांना त्याचा फटका बसला आहे. महापुरामुळे गावे पुनर्वसन करण्याचा मुद्दा उपस्थित होते. तसेच या बैठकीत उजनी प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनींचे वाटप तातडीने सुरू करण्यास संबंधित अधिकार्‍यांना निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande