प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी व्याख्यान
पुणे, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री, समाजवादी नेते आणि अर्थशास्त्रज्ञ प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनतर्फ
प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी व्याख्यान


पुणे, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।

स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री, समाजवादी नेते आणि अर्थशास्त्रज्ञ प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनतर्फे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील माजी प्राध्यापक प्रा. डॉ. अरुणकुमार यांचे ‘पुँजीवाद के चरण और भारत में आज़ादी के बाद बढ़ती चुनौतियां’ या विषयावर आधारित हे व्याख्यान हिंदी भाषेत होणार असून, त्यात भारताच्या आर्थिक वाटचालीतील बदलते प्रवाह आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक-आर्थिक आव्हानांचा ऊहापोह होईल.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेते साथी गजानन खातू उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनतर्फे करण्यात आले असून, सर्व समाजवादी कार्यकर्ते, विचारवंत आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष लोमटे आणि सहसचिव उपेंद्र टण्णू यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande