‘टॉप क्लास शिक्षण योजने’ चा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
नंदुरबार, 10 ऑक्टोबर (हिं.स.) उच्च शैक्षणिक शाळेत शिकणाऱ्या इतर मागासवर्ग, आर्थिक दृष्ट्या मागास व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी योजनेंतर्गत ‘टॉप क्लास शिक्षण योजने’ चा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करावे असे आ
‘टॉप क्लास शिक्षण योजने’ चा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन


नंदुरबार, 10 ऑक्टोबर (हिं.स.) उच्च शैक्षणिक शाळेत शिकणाऱ्या इतर मागासवर्ग, आर्थिक दृष्ट्या मागास व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी योजनेंतर्गत ‘टॉप क्लास शिक्षण योजने’ चा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, विभागाचे सहायक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. केंद्रीय क्षेत्र योजना - टॉप क्लास शिक्षण योजना (इयत्ता 9 वी ते 10 वी) या नावाने ओळखली जाते. ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 20 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि

यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासकीय मदतीतून

भागविणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पात्रता व कव्हरेज:

 लाभार्थी: ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थी.

 कौटुंबिक उत्पन्न: विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल रुपये 2.50 लाख असावे.

 निवड पद्धत: मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादी तयार करून निवड केली जाईल.

 आरक्षण: या योजनेत किमान 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत.

 शाळा निवड: सलग वर्षांमध्ये 100 टक्के निकाल देणाऱ्या सर्वोत्तम शाळांची निवड केली जाते.

आर्थिक मदत (वर्गनिहाय)

योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते:

 इयत्ता 9 वी व 10 वी: रुपये 75 हजार (शुल्क, वसतीगृह शुल्क, परीक्षा फी, पुस्तके, गणवेश यासाठी).

 इयत्ता 9 वी व 10 वी: रुपये 1 लाख 25 हजार (शुल्क, वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, कोचिंग फी

यासाठी).

अर्ज करण्याची प्रक्रिया

1. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर https://scholarships.gov.in/ ऑनलाईन अर्ज करणे

2. शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल.

3. राज्य सरकारकडून अंतिम मंजूरी.

4. मुले व मुलींसाठी स्वतंत्र मेरीट यादी तयार.

5. शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा केली

जाईल.

आवश्यक कागदपत्रे

सर्व कागदपत्रे पीडीएफ/जेपीईजी (PDF/JPEG) स्वरूपात अपलोड करावी लागतील.

 जात प्रमाणपत्र (OBC/EBC/DNT)

 उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपर्यंत)

 इयत्तेचे गुणपत्रक

 शाळेचा प्रवेश/अभ्यास प्रमाणपत्र

 आधार कार्ड

 बँक पासबुकची प्रत

 पासपोर्ट साईज फोटो

पीएम यशस्वी योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील टॉप क्लास शाळेच्या यादीतील 100 टक्के पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने

पोर्टलवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असेही इतर मागास बहुजन कल्याण, विभागाचे सहायक संचालक सुंदरसिंग

वसावे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande