बीडच्या मोमीनपुरा भागातील लक्ष्मी आई मंदिराची विटंबना
बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।बीड शहरातील मोमीनपुरा भागातील जी. एन. फंक्शन हॉल परिसरात असलेल्या लक्ष्मी आई मंदिराची आज सकाळी काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची खेदजनक घटना घडली. या पार्श्वभूमीवर तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कुठलाही अनुचि
अ


बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।बीड शहरातील मोमीनपुरा भागातील जी. एन. फंक्शन हॉल परिसरात असलेल्या लक्ष्मी आई मंदिराची आज सकाळी काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची खेदजनक घटना घडली. या पार्श्वभूमीवर तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आणखी फौजफाटा तैनात केला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.तसेच पोलिस प्रशासनाशी संवाद साधून आवश्यक ती माहिती घेतली. असे प्रकार शहराची शांतता, एकता, सलोखा बिघडवणारे आहेत.

यावेळी नागरिकांना शांतता, एकता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande